आपली पोगरवाडी,
आपला अभिमान

एकत्र येऊ, गावाचा विकास घडवू, स्मार्ट आणि समृद्ध पोगरवाडी घडवू.

आरोग्य

गावासाठी उत्तम आरोग्य सेवा आणि जनजागृती उपक्रम.

शिक्षण

गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी संधी.

व्यवसाय

स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन आणि रोजगाराच्या नवनवीन संधी.

९० %

साक्षरता दर

शाळा

१५० +

एकूण घरे

६९७

लोकसंख्या

गावाचा नकाशा

पोगरवाडी गाव नकाशा

LGD Code

563882

तालुका

सातारा

क्षेत्रफळ

५८३ एकर

जिल्हा

सातारा

🏡 Digital Village Initiative

आमच्या गावाबद्दल

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पोगरवाडी हे निसर्गसंपन्न, प्रगत आणि संस्कृती जपणारे गाव आहे. गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे शिक्षण, स्वच्छता, शेती, डिजिटल सेवा आणि विकासकामांमध्ये गावाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शूर वीरांचे बलिदान, सामाजिक ऐक्य आणि विकासाची नवी दिशा हीच आमच्या गावाची ओळख आहे.
एकच ध्येय, गावाचा विकास घडवू, स्मार्ट आणि समृद्ध पोगरवाडी घडवू.

समृद्ध शिक्षण

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि डिजिटल शिक्षणाचा प्रसार.

आधुनिक शेती

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचा विकास.

स्वच्छ व आरोग्यदायी

स्वच्छता, शुद्ध पाणी आणि आरोग्य सुविधांवर भर.

विकासाची नवी दिशा

रस्ते, सुविधा आणि डिजिटल सेवा उपलब्ध.

शूर वीरांचे बलिदान

आमचा अभिमान

ऑपरेशन पराक्रम मधील पहिले शहीद वीरजवान

अंकुश परशुराम घोरपडे

जन्म दिनांक

१५ फेब्रुवारी १९८०

जन्म गाव

पोगरवाडी, सातारा

सेनेत भरती

१५ नोव्हेंबर १९९९

रँक

शिपाई

युनिट

११ मराठा लाईट इन्फंट्री

ऑपरेशन पराक्रम मधील पहिले शहीद वीरजवान अंकुश परशुराम घोरपडे यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९८० रोजी सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी येथे झाला. त्यांनी १५ नोव्हेंबर १९९९ रोजी भारतीय सैन्यात प्रवेश केला आणि ११ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये शिपाई म्हणून देशसेवा बजावली. जम्मू-काश्मीरमधील मंडी तालुका, पुंछ जिल्हा लगतच्या जंगलमय व बर्फाळ भागात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन पराक्रम’ अंतर्गत २ जुलै २००२ रोजी त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवत ५ अतिरेक्यांचा खात्मा केला आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करले.
आमचा अभिमान

कर्नल संतोष यशवंत महाडिक

शौर्यचक्र (SC), सेना मेडल (SM)

जन्म दिनांक

१५ जानेवारी १९७७

जन्म गाव

पोगरवाडी, सातारा

सेनेत भरती

१९९८ (IMA देहरादून)

रँक

कर्नल

युनिट

२१ पॅरा (स्पेशल फोर्सेस)

कर्नल संतोष यशवंत महाडिक यांचा जन्म १५ जानेवारी १९७७ रोजी पोगरवाडी येथे झाला. त्यांनी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश केला आणि २१ पॅरा (स्पेशल फोर्सेस) मध्ये सेवा बजावली. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान १७ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवत मातृभूमीसाठी वीरमरण पत्करले. २००१ मध्ये ‘ऑपरेशन सॅंटो’ मधील शौर्यासाठी त्यांना सेना मेडल (SM) तर २०१५ मध्ये त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी शौर्यचक्र (SC) या देशाच्या तिसऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे शौर्य, नेतृत्व आणि राष्ट्रसेवा सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

संस्कृतिक कार्यक्रम

“आपली परंपरा, आपली संस्कृती, आपला अभिमान”

⚔️ शिवजयंती उत्सव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावामध्ये भव्य मिरवणूक, पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते

🥁 महिला लेझीम पथक

गावातील महिला भगिनींचे लेझीम पथक विविध उत्सव व राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये पारंपरिक कला सादर करून गावाची संस्कृती जपते.

🪔 गणपती उत्सव

सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, स्पर्धा व सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.

🙏 जानाई देवी यात्रा

ग्रामदैवत जानाई देवी यात्रेमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. यात्रा हा गावातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे.

ग्रामपंचायत पोगरवाडी

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी.

5

ग्रामपंचायत सदस्य

1

ग्रामपंचायत

समर्पित

तत्पर सेवा

2

जि. प. शिक्षक

प्रमुख पदाधिकारी

सौ. सुलाबाई राजाराम लोहार

सौ. शोभाताई जयवंत घोरपडे

श्री. सचिन वायदंडे

ग्रामपंचायत सदस्य

श्री. सुनील किसन
घोरपडे

सौ. लक्ष्मी हणमंत
गुरव

श्री. लहू परशुराम
घोरपडे

सौ. सुवर्णा अतिश
शिंदे

सौ. मनीषा तानाजी
घोरपडे

महत्वाचे अधिकारी

सौ. वैशाली जोतिराम
गुरव

श्री. लहू परशुराम
घोरपडे

सौ. अलका सुरेश
काटकर

सौ. सुनीता भिकू
मोहिते

ई-मेल

info@pogarwadi.in

पत्ता

पोगरवाडी, सातारा, महाराष्ट्र ४१५००२

कामाचे तास

सोम - शुक्र : सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:००

आम्हाला संदेश पाठवा

खालील फॉर्म भरा आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.